आधुनिक व स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात आपले शरीर व मन खूप थकून जाते. त्यामुळे ताण-तणाव वाढून, मानसिक आरोग्य बिघडते. त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होते. नागरिकांची ही गरज ओळखून, ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत ९ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसीय संपूर्ण आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. यासंदर्भात योगगुरु डॉ.हंसाजी योगेंद्र यांच्याशी खास बातचीत...